spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोगस अपंग प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या कांद्री येथील जागेश्वर समरीत पासून अरोली व परिसरातील नागरिकांनी सावधान राहावे: प्रशांत भुरे 

किशोर साहू, मौदा :- जे नागरिक अपंग आहेत व ज्यांच्याकडे अपंगत्वाचे खरे प्रमाणपत्र आहेत अशा नागरिकांना शासनाकडून यावर्षीपासून अडीच हजार रुपये मासिक अनुदान देण्यात येत आहे. मासिक अडीच हजार रुपये मिळण्याच्या लालसेपोटी तालुक्यातील काही अपंग नसणारे नागरिकही बोगस अपंग प्रमाणपत्र बोगस व्यक्तींकडून तयार करून या योजनेच्या लाभ घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. मौदा तालुक्याच्या सीमेवर स्थित भंडारा जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या कांद्री येथील जागेश्वर समरीत नामक व्यक्ती असे बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवून देत असल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मौदा तालुका शिवसेनाप्रमुख तथा संजय गांधी निराधार समिती सदस्य प्रशांत भुरे यांनी नुकताच त्याच्या फोटो टाकून वायरल केला. जागेश्वर समरीत बोगस अपंगत्व प्रमाणपत्र बनवून देण्याचे नागरिकांकडून पाच हजार रुपये घेत असून, त्याने बनवून दिलेले डॉक्युमेंट्स स्कॅन होत नसून, ते प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध होत आहे. तरी अरोली व परिसरातील नागरिकांनी जागेश्वर समरीत व त्यासारख्या बोगस अपंगत्व प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या व्यक्तींपासून सावधान राहण्याचे आव्हान व्हिडिओच्या माध्यमातून भुरे यांनी केले आहे. खरे अपंग लाभार्थ्यांनी खरे अपंगत्व प्रमाणपत्र बनून घेण्यासाठी भुरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हानही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

Popular Articles