– ठिकठिकाणी पूजा-अर्चना, आरती व प्रसाद वितरण; ढोल-ताशे आणि भजन मंडळांच्या गजरात रथयात्रेने केले नगरभ्रमण
कामठी :- श्री सत्य साई सेवा संघटना, नागपूर जिल्हा यांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री सत्य साई प्रेम वाहिनी रथयात्रेचे कामठी-येरखेडा परिसरात भक्तिभावपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी श्री सत्य साई बाबांच्या प्रतिमेचे पूजन, आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले. ढोल-ताशांचा निनाद, विविध भजन मंडळांचे सुमधुर भजन आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
येरखेडा येथे रथयात्रेच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ मार्गदर्शक गणेश महादेवराव कठाणे यांच्या हस्ते श्री सत्य साई बाबांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशे आणि भजन मंडळांच्या गजरात रथयात्रेने कामठी शहराकडे प्रस्थान केले. मार्गातील विविध चौकांमध्ये नागरिकांनी रथयात्रेचे स्वागत करून श्री सत्य साई बाबांचे दर्शन घेतले आणि प्रसादाचा लाभ घेतलेरथयात्रेने तेलीपुरा, दुर्गा चौक, शिवपंचायत मंदिर, भोयर लेआउट, झेंडा चौक, तारामाता चौक, मरारटोळी, भूषणनगर, सिंधी लाईन, जयस्तंभ चौक, गोयल चौक, सत्यनारायण चौक, नेताजी चौक, मेन रोड, मोटर स्टँड चौक, घोरपड रोड, देवी मंदिर आणि गोशाळा या मार्गांवरून नगरभ्रमण केले. त्यानंतर रथयात्रा नवीन कामठी येथून पुढील प्रवासासाठी अजनीकडे रवाना झाली.
रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी पूजन, आरती आणि प्रसाद वितरणाचे आयोजन केले होते. श्री सत्य साई बाबांच्या प्रेम, सेवा, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या रथयात्रेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी कामठीचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, येरखेडा नगरपंचायतीचे अध्यक्ष राजकिरण बर्वे, उपाध्यक्ष रंजना काळे, नगरसेवक सुशांत सलाम, प्रशांत काळे, राकेश काळे, सचिन राऊत, सुदाम राखडे, सुषमा राखडे, वंदना वाजुरकर, सुरेंद्र वाजुरकर, अर्चना गभने, रजनी कारेमोरे, अशोक कारेमोरे, शीला देशमुख, यश रेड्डी, मेघा गिरे, हर्षा रोकडे, ललित गभने, स्वाती रहमतकर, अयोध्या राठोड, सुधाकर राठोड, सुषमा हेलोंढे आणि अमित ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते.








