spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर येथे जलसंधारणच्या २८ हजार ६८८ कामांचा धडाका

– विकासकामांचा ‘प्लॅन’ तयार

चंद्रपूर :- येथील जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान (व्हीबीजी-राम-जी) अंतर्गत ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ग्रामीण मजुरांना रोजगार मिळण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. या कामांचे नियोजन करण्यात आले असून रबी हंगामातच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात कामे प्रत्यक्ष सुरू होतील.

१६ हजार ३५६ सिंचन विहिरींचा समावेश

१ सन २०२६-२७ च्या वार्षिक नियोजन आराखड्यात ८९९ मामा तलाव खोलीकरण, १६२० बोडी खोलीकरण, २३७५ नाला खोलीकरण, २४३८ शेततळे, ८७४ बंधारे बांधकाम व गाळ काढणे, १८९ रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि १६ हजार ३५६ सिंचन विहिरींच्या कामांचा समावेश आहे. याशिवाय २४५६ वृक्षलागवड, २ ७१२ फुलशेती, ७४७ गवत लागवड आणि ६२ सलग समतल चर (सीसीटी) प्रस्तावित आहेत. विहिरींच्या कामामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.

८२५ ग्रामपंचायतींत जलतारांची कामे

भूजल पुनर्भरणासाठी जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी १०० याप्रमाणे एकूण ८२ हजार ५०० जलतारांची कामे करण्याचे नियोजन आहे. तसेच ‘युक्तधारा’ प्रणालीद्वारे आतापर्यंत १७ हजार ५४१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

९६ ग्रामपंचायतींत ६६ हजार रोपे

अभियान आणि जिल्हा खनिज विकास निधींच्या अभिसरणातून ४५ ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवड, तर ५१ ग्रामपंचायतींमध्ये फळबाग लागवडीची प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ६६ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

Popular Articles