spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा

बुलढाणा :- खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामाच्या आशा कायम ठेवण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘कॅपॅसिटर’ बसविण्याबाबत जनजागृती व प्रात्यक्षिके सुरू केली आहेत. अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी बुलढाणा , अकोलाआणि वाशिम जिल्ह्यांतील शेतांना भेटी देत शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केलंय. विहीर किंवा बोअरवेल मधील विद्युत पंपांना कॅपॅसिटर बसवल्याने वीजपुरवठ्यातील अडचणी कमी होण्यास, योग्य दाबाची वीज मिळण्यास आणि रोहित्रांचे बिघाड कमी होण्यास मदत होऊ शकते. या उपक्रमामुळे रब्बी पिकांना पाणी देणे सुलभ होण्याची अपेक्षा असून, कॅपॅसिटरचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. अस आवाहन सुद्धा महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस आर अहिरे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

धान बोनसबाबत शासन सकारात्मक, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार

गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांत शंभर टक्के शेतकरी हे धान उत्पादक असून, मागील हंगामातील धानाचा बोनस अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी बोनसच्या प्रश्नावर आपण सातत्याने विधानसभेत आवाज उठवला असून शासनाकडे यासंदर्भात सतत पाठपुरावा केला जात असल्याचे वक्तव्य केले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, धान बोनसच्या मुद्द्यावर राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, शासनाने बोनस नाकारलेला नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे बोनस मिळण्यास विलंब झाला असला, तरी या अडचणी दूर करून धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर बोनस मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर विचारमंथन व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भंडाऱ्यात 53 हजार हेक्टरवरील पीक नुकसान पंचनामे पूर्ण

राज्य शासनानं जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीत भंडारा जिल्ह्यातील 5 तालुक्यांचा समावेश आहे. ट्रिगर 1 अंतर्गत या 5 तालुक्यातील 693 गावांचा यात समावेश असून आतापर्यंत 333 गावांमधील 53 हजार 121 हेक्टरचे दुष्काळी पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात 83 हजार 938 खातेदारांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

Popular Articles