spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एफडीए अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

पुणे :- गेल्या काही महिन्यांमध्ये एफडीएने मोठ्या कारवाई केल्या, अनेक ठिकाणी छापे टाकले, अनेक हॉटेल आणि दुकाने बंद केली, अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, कार्यक्षेत्राबाहेर केलेली कारवाई एफडीएच्या अधिकाऱ्यांना भोवणार आहे. तब्बल २० हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मंत्री कार्यालयातील ही काही माजी अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि आयुक्त तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर आले आहेत. पुणे आणि भिवंडीत एका खाजगी कंपनीवर या अधिकाऱ्यांनी रेड केली होती. मात्र ही रेड कार्यक्षेत्राच्या बाहेर असून काही पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच सुपारी प्रकरणांमध्ये एफडीएच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. आता तब्बल 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे एफडीएची जशी बाहेर साफसफाई सुरू आहे तशीच विभागांमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांची साफसफाई सुरू असल्याच पाहायला मिळतं आहे.

या प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनीच कार्यक्षेत्राबाहेर जाऊन छापे टाकल्याचा आरोप झाल्याने विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलं जात असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. या चौकशीत नियमबाह्य कारवाई किंवा वैयक्तिक हितसंबंधांचा सहभाग आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.

संजय राऊतांनी लिहलेलं तुकाराम मुंढेंना पत्र

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहले होते. या पत्रात संजय राऊत यांनी अन्न व सुरक्षा भेसळ याबाबतच्या कारवाईबाबत अभिनंदन करत FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केली होती. तुकाराम मुंढे

यांनी एफडीए आयुक्त झाल्यानंतर ज्या कारवाया केल्या त्याचं संजय राऊत यांनी अभिनंदन करत काही गोष्टी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

आपल्या धडाडीचे व सचोटीचे मी नेहमीच कौतुक केले आहे. आताही आपण मे २०२६ पासून ‘एफडीए’ म्हणजे अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अॅनालॉग पनीर, भेसळयुक्त दूध, हॉटेल किचनमधील अस्वच्छता, ‘एक्सपायरी’ उलटून गेलेल्या साठ्यांवर आपण केलेली कारवाई जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील ग्राहकाला आपण काय खातोय, विकत घेतो हे कळायलाच हवे. आपण त्याबाबत जनतेला जागरूक केले हे महत्त्वाचे.आपले अभिनंदन करताना माझ्यासमोर आलेल्या काही गोष्टी सांगणे आवयश्क आहे. या कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक आहे.

मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, एका बाजूला आपण कारवाईचा, धाडीचा धडाका लावून व्यावसायिकांत दहशत निर्माण केली आहे. याबाबत आपण नेहमीप्रमाणेच ‘प्रसिद्धी’च्या झोतात आहात. याचाच गैरफायदा एफडीएमधील अधिकारी घेत आहेत. एफडीएतील पदनिर्देशित अधिकारी (DO) सहाय्यक आयुक्त तसेच अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) उघडपणे हॉटेल, रेस्टॉरंट, क्विक कॉमर्स व्यवसायांना परवाना निलंबनाच्या धमक्या देऊन मोठ्या प्रमाणात वसुली करीत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना धमक्या, ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा जास्त जोमाने सुरू झाला आहे.

Popular Articles