spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एच.एस.महात्मे संस्कार विहार स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

– लायन्स क्लब नागपूर अमेतर्फे विद्यार्थ्यांसाठी नेत्र व दंत तपासणी; बेंच वितरण उपक्रमही संपन्न

नागपूर :- एच.एस.महात्मे संस्कार विहार स्कूल येथे लायन्स क्लब नागपूर अमेच्या वतीने व्हिजन सर्व्हिस वीक अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना बेंच वितरणाचाही उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची व दातांची तपासणी करून त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर्स रामदास ठाकरे, लता ठाकरे व डॉ.गौरव अग्रवाल होते. कार्यक्रमाला लायन्स क्लबच्या अध्यक्षा कीर्ती खेरडे, सचिव अश्विनी गिरीपुंजे आणि खजिनदार MJF उषा ढोबळे यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी अंश गुप्ता याने केले, तर शौर्य आंबिलढुके याने आभार प्रदर्शन केले. लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Popular Articles