– मुख्य टपाल घर परिसरात यवतमाळ सॉर्टिंग काउंटर सुरू
यवतमाळ :- दिवाळी सणानिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य टपाल घर परिसरातील यवतमाळ सॉर्टिंग काउंटरवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगसाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे काउंटर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या काउंटरवर स्पीड पोस्ट, देशांतर्गत पार्सल, आंतरराष्ट्रीय पत्रे, पार्सल आणि ईएमएस सेवा उपलब्ध राहणार आहेत. दिवाळीनिमित्त नातेवाईकांना भेटवस्तू, मिठाई व फराळ पाठविण्यासाठी नागरिकांनी या विस्तारित सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे डाक सेवा, यवतमाळचे अधीक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे.
परदेशात पार्सल पाठविताना संबंधित देशाचे आयात नियम व सीमाशुल्क नियमांची माहिती काउंटरवरून घ्यावी. खाद्यपदार्थ पाठविण्यापूर्वी त्यांचे योग्य पॅकिंग व सुरक्षित सीलिंग करावे, तसेच संबंधित देशात त्या पदार्थांच्या आयातीस परवानगी आहे का, याची खात्री करावी. दिवाळीच्या काळात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविण्यासाठी टपाल विभागाच्या या विशेष सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे डाक सेवा, यवतमाळ यांनी केले आहे.








