spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीतील धम्मप्रेमी भिम अनुयांया कडून नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचे अभिनंदन

कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नगर परिषद कामठी चे लोकनियुक्त *अध्यक्ष अजयजी अग्रवाल यांच्या पुढाकाराने ड्रेगन पैलेस टेम्पल परिसरात करण्यात आलेल्या प्रशासकीय सुविधा मुळे धम्म प्रेमी अनुयायांना सुखद अनुभव मिळाला, महसूल मंत्री व नागपुर /अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार  नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी नगर परिषद विभाग ,पोलिस विभाग आणि महसूल विभागा च्या प्रशासकीय अधिकाऱ्या सह दोन तिनदा आढावा बैठक घेऊन योग्य प्रकारे सुक्ष्म नियोजन केले. नगर परिषद मार्फत विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेशी विद्युत व्यवस्था, अग्निश्मन व्यवस्था,आरोग्य व्यवस्था,शौचालय व्यवस्था आणि स्वच्छता वर विशेष भर देण्यात आला.पोलिस प्रशासनाने नगर परिषद च्या सहकार्य ने पार्किंग, अलाउसमेंट, बैरेकेटिंग, आणि चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. डीसीपी ऐसीपी दोन्ही पोलिस निरीक्षक आणि शेकड़ो पोलिस अधिकारी कर्मचारी अहोरात्र प्रत्यक्ष फिल्ड वर कर्तव्यावर हजर होते, महसूल प्रशासनाने सर्व विभागा सोबत समन्वय ठेऊन मोलाचे सहकार्य केले.

नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या सूक्ष्म नियोजना मुळे ड्रेगन पैलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या लाखो धम्म प्रेमी भिम सैनिक बांधवांना गैर सोयीचा त्रास सहन करावा लागला नाही,

भाजपा तर्फे प्रथमच भव्य भोजन दान व स्वागत मंच

यावेळी धम्म प्रेमी भिम सैनिक बांधवांच्या स्वागता साठी भव्य स्वागत मंच आणि भव्य स्वागत प्रवेश द्वार *महसूल मंत्री व पालकमंत्री मा ना चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब*

यांच्या सूचने नुसार भाजपा तर्फे ड्रेगन पैलेस टेम्पल रोड आनंद नगर येथे उभारण्यात आला होता.

नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या पुढाकाराने सलग दोन दिवस धम्म प्रेमी भिम सैनिका साठी नॉन स्टॉप भोजनदान करण्यात आले, विदर्भ,मराठवाड़ा, खानदेश आणि तमिलनाडु पंजाब उत्तर प्रदेश मध्यप्रदेश हरियाणा येथील धम्म प्रेमी भिम सैनिकांनी भोजनदानाचा यथेच्छ लाभ घेतला

कामठी आणि परिसरातील सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने संघमित्रा फाउंडेशन चे अध्यक्ष उज्वल रायबोले,डॉ विनायक गडेकर,विक्की बोंबले,अरविंद चवडे, बिरजू चहांदे,हितेश तिरपुड़े,सचिन गजभिये यांनी नगराध्यक्ष अजयजी अग्रवाल यांचे या पुढाकारा बद्द्ल कौतुक केले असून दरवर्षी हा उपक्रम राबविण्या करिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular Articles