spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दर्शन कॉलनीत रावण दहन व नेत्रदीपक फटाका शो

– भक्तिगीतांच्या सुरांनी दसरा महोत्सवात रंगत; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- विजया दशमीनिमित्त दर्शन कॉलनी येथील शीतला माता मंदिर मैदानावर रावण दहन, नेत्रदीपक फटाका शो आणि भक्तिगीतांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. रंगीबेरंगी आतषबाजी आणि संगीताच्या कार्यक्रमाने परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नागपूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव प्रशांत पवार होते. विरोधी पक्षनेते तथा प्रदेश महासचिव तानाजी वनवे आणि मालुताई वनवे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, नगरसेविका आभाताई पांडे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात रावण दहनानंतर आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशाल खांडेकर, विजय मधुमटके यांच्या म्युझिकल ऑर्केस्ट्राने कार्यक्रमात रंगत आणली. विजय वनवे हे मुख्य आयोजक होते, तर बालाजी डिकोंडवार आयोजन समितीचे अध्यक्ष होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलीस विभागाचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन राजेश अंबुलकर यांनी केले. वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय हा विजया दशमीचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. दर्शन कॉलनीसह पूर्व व मध्य नागपुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दसरा महोत्सवाचा आनंद घेतला.

Popular Articles