spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात येथे विजयादशमी निमित्त भव्य रावण दहन कार्यक्रम

किशोर साहू, मौदा :- विजया दशमीच्या पर्वावर ‘खात नवयुवक रावण दहन समिती’च्या वतीने एका भव्य रावण दहन कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात लहान मुलांनी साकारलेली सुंदर वेशभूषा आणि सादरीकरण, मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व सत्कार सोहळा, परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षणाचे केंद्र ठरले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल, माजी सरपंच नीलकंठ गिरीपुंजे, सरपंच खात माधुरी कैलास वैद्य, माजी तालुकाध्यक्ष भाजपा, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, उपसरपंच खात रवींद्र मांडरकर ,कैलास वैद्य माजी सरपंच कैलास वैद्य, माजी उपसरपंच शंकर वैद्य, अध्यक्ष भाजपा खात गुड्डू गिरीपुंजे, ग्रामपंचायत सदस्यगण पुरुषोत्तम शर्मा, अरविंद तांबूलकर, शैलेश गिरीपुंजे, कांचन देवतारे, निर्मला मेंढे,बबीता खोब्रागडे, रंगनाथ खराबे, मंगेश आंबीलढुके,रविन्द्र लेदे,सचिन समरीत,अशोक दळणे, सचिन वाहणे,उमेश वैद्य, युवराज गिरीपुंजे, मोरेश्वर वैद्य, नीलकंठ दिघोरे तसेच गाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून दसऱ्या निमित्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Popular Articles