spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पदवीधर निवडणूक रद्द करण्यासंदर्भात याचिकेवर मतमोजणीच्या दिवशीच नागपूर खंडपीठ येथे सुनावणी ? 

– ८४०० दुबार मतदार, डिप्लोमा व डिफार्म यादीत सामील न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रा. सचिन काळबांडे.            

नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीतील कथित अनियमितते विरोधात प्रा.सचिन शंकरराव काळबांडे नागपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणीनंतर हे प्रकरण पुन्हा नागपूर खंडपीठात वर्ग करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. मंगळवार दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणीच्या दिवशी या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याचिकेत नागपूर विभागातील ९८ हजार ७८२ अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या मुद्तीपर्यंत प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला .अंतिम मतदार यादी, अर्जांची छाननी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ८४०० मतदान दुबार नोंदणी झालेल्या आहे.

डिप्लोमा व डिफार्म मान्यता नसताना यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अंतिम यादी डिसेंबर २०२५ मध्ये प्रकाशित करण्यात आली असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तसा ऑर्डर मध्ये नमूद करण्यात आला आहे. दुसरीकडे रचना इंदुरकर निवडणूक अधिकारी ह्या सांगतात की,अंतिम यादी नेमकी कधी प्रकाशित होईल हे सांगता नाही, काम सुरू आहे असे 10 ऑक्टोबर ला सांगतात. *खरे कोण बोलत आहे आणि खोटे कोण, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सदर निवडणूक ही बोगस मतदार यादीवर झालेली

आहे म्हणून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार, असा इशारा प्रा.सचिन काळबांडे यांनी दिला. आता नागपूर खंडपीठाच्या मतमोजणीच्या दिवशीच असलेल्या सुनावणीकडे पदवीधर मतदार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशी माहिती काळबांडे यांनी दिली.

Popular Articles