किशोर साहू, मौदा :- विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी अरोली येथील मतदान केंद्र(बूथ) क्रमांक ४३ वर ३७० पैकी २६१ मतदारांनी मतदान केले. अरोली येथे ७०.५४%, खात येथे ७६.७०%, मौदा येथील दोन मतदान केंद्रात अनुक्रमे ७८.९८% व७२.३७%मतदान झाले . मौदा तालुक्यात एकूण १९१० पदवीधर मतदार आहेत.अत्यंत शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. उद्या मंगळवार (ता. 27 ऑक्टोबर)ला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तालुक्यात पदवीधर मतदार भरभरून मतदानासाठी बाहेर पडल्याने उमेदवारांचे समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे.
अरोली येथील महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या समर्थनात लावलेल्या बूथवर त्यांचे समर्थक महायुतीचे नेते राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण,शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत भुरे, मौदा नगरपंचायत नगराध्यक्ष प्रसन्ना (राजा) तिडके, चाचेर- निमखेडा जि प क्षेत्रातील भाजपचे भावी उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, पंचायत समिती माजी उपसभापती खेमराज चाफले, सामाजिक कार्यकर्ते पंढरी कडू, अरोली सर्कलचे भाजप नेते सदानंद निमकर,विष्णू देशमुख, रोशन उमप, कैलास समरीत, कोदामेंढी उपसरपंच गोपाल गिरमेकर सह महायुतीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.








