spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आडापूल साईबाबा मंदिरात हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

– वार्षिक महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम; राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कामठी :- कामठी शहरातील आडापूल परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त श्री साईबाबा मंदिरात वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या महोत्सवाला पंडित लवली महाराज, कामठीचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, येरखेडा नगरपंचायतीचे अध्यक्ष राजकिरण बर्वे, कांद्री नगर परिषदेचे अध्यक्ष सुजित पानतावणे, भाजपचे नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान, सत्तापक्ष नेते अतुल हजारे, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती प्राचार्य अवंतिका लेकुरवाळे, माजी नगराध्यक्ष हाजी शकूर नागानी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक कमल यादव आणि आसिफ सरमतीयासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक मनीष बनसोड यांची उपस्थिती होती.

माजी नगरसेवक कपिल गायधने, मंदिर पंच कमिटीचे पदाधिकारी मनोहर मन्सूरकर, सुदेश अग्रवाल, सुदाम राकडे, उमाशंकर सिंग, रवी कोटपल्लीवार, नरेश बर्वे, सुरेश ठाकरे, गणेश यादव, दिलीप बडवाईक, लाला खंडेलवाल, राजू बुटानी, राजेश अग्रवाल, यश चव्हाण, विजय उरकुडे, जेता फुले, डॉ. सचिन वानखेडे, प्रणय राकडे, सुषमा राकडे, जव्हार मोरया, अनिल नेवारे आणि प्रवीण मन्सूरकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वार्षिक महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. हजारो भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे, रामेश्वर कायंदे आणि नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे महाप्रसाद कार्यक्रम शांततेत पार पडला.

Popular Articles