spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिवरी (हेटी) येथे लोकसहभागातून उभारणी; मृद व जलसंधारण विभाग, सामाजिक संस्थांचा उपक्रम

यवतमाळ :- मृद व जलसंधारण विभाग, यवतमाळ व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुक्यातील हिवरी (हेटी) येथे वनराई बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले. लोकसहभागातून वनराई बंधारा बांधून नागरिकांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश दिला़

याप्रसंगी मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल्ल खिराडे, मृद व जलसंधारण उपविभाग, यवतमाळ उपअभियंता अश्विन पवार, मृद व जलसंधारण उपविभाग, मारेगाव उपअभियंता प्रशांत कदम, मृद व जलसंधारण उपविभाग, घाटंजी उपअभियंता आशिष टिमसे तसेच मृद व जलसंधारण उपविभाग दिग्रस येथील आदित्य राहुलवार, विभागातील वरिष्ठ अभियंते, कनिष्ठ अभियंते, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात पैनगंगा कृषी विज्ञान मंडळ, उमरी कापेश्वर या संस्थेचे कार्यकारी अधिकारी सचिन खडेकर, दिनेश जयस्वाल, जय माता दी बहुउद्देशीय महिला मंडळ, हिवरीच्या सचिव उज्ज्वला खडेकर, सखी मागासवर्गीय बहुउद्देशीय महिला मंडळ, पिंपळगावचे पदाधिकारी महेश नन्नावरे, शांतीरूप ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, अमरावतीचे अध्यक्ष रवींद्र डोंगरे यांनी सहभाग घेतला. जलसंधारण ही काळाची गरज असून, पाण्याचा काटकसरीने वापर करणे व उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यातही शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन अशा जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले़ या सामाजिक संस्थांचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनीही जलसंधारणाच्या या उपक्रमात सहभाग नोंदविला.

‘असे’ आहेत वनराई बंधाºयाचे फायदे

वनराई बंधायामुळे पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी काही काळ अडवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया वाढण्यास आणि भूजल पातळीत सुधारणा होण्यास हातभार लागू शकतो. परिसरातील विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता वाढण्यास, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय मृदधूप कमी करणे, पावसाच्या पाण्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करणे आणि जलसंधारणाविषयी जनजागृती निर्माण करणे हे वनराई बंधाºयाचे महत्त्वाचे फायदे आहेत.

Popular Articles