कन्हान :- बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटी, कन्हान यांच्या वतीने कन्हान बुध्द विहार सिध्दार्थ कॉलोनी गणेश नगर कन्हान येथे दोन दिवसी वर्षावास समापन समारंभ विविध धार्मिक व धम्मविषयक कार्यक्रमांच्या माध्यमातुन उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या वर्षावास कालावधीत उपासिका यांनी भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली धम्मप्रवचनांचे तसेच ‘बुद्ध आणि धम्म ’ या ग्रंथाचे वाचन, अभ्यास व विश्लेषण करून भगवान बुद्धांच्या विचारांचा धम्मतत्त्वांचा अभ्यास केला. सोमवार (दि.२६) ऑक्टोबर रोजी भंते केसीएस लामा यांच्या मार्गदर्शनाखाली महापरित्राण पाठ व धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॅन्डल प्रज्वल ना द्वारे मानवंदना अर्पण करण्यात आली. तसेच बुद्ध विहारात खीरदान व फळवितरण करण्यात आले.
मंगळवार (दि.२७) ऑक्टोबर रोजी बुद्धवंदना, धम्म प्रवचन व महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले. आर्य नागार्जुन सुरई ससाई भंतेजी यांच्या अध्यक्षतेत समारंभाची सांगता झाली. यावेळी सोसायटीच्या वती ने पाच भंतेजींना चीवरदान करण्यात आले. तसेच उपासक-उपासिकांना भारतीय संविधानाच्या प्रास्तावि केचे वितरण करून सामुहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बी डब्ल्यु एस चे कार्य कारी अध्यक्ष भगवान नितनवरे, उपाध्यक्ष दौलतरा व ढोके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कन्हान बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी आणि धम्म चळवळीच्या प्रसारासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा व संघर्षाचा आढावा घेतला. या कार्यक्रमास प्रभु धनविजय, पुंडलिक मानवटकर, गौतम वैद्य, रमेश गजभिये, पुनम उके, अनिल डोंगरे, शैलेश माटे, स्वप्निल वाघधरे, निशांत मोठघरे, आनंद चहांदे, सुदाम नितनवरे, कल्पना नित नवरे, दुर्गा गजभिये, शीला मानवटकर, पिंकी मेश्राम, लीलावती बेलेकर, सिंधु वाघमारे यांच्यासह अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.








