– सरपंचा लुबिनी महेश कलारे यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची नवी संधी
किशोर साहू, मौदा :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने पी.एम.श्री. उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, चाचेर येथे पीएमश्री योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) लॅबचे उद्घाटन सरपंचा लुबिनी महेश कलारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या AI (एआय)लॅबमध्ये संगणक व लॅपटॉप, रोबोटिक्स किट, सेन्सर व इलेक्ट्रॉनिक साहित्य, स्मार्ट बोर्ड तसेच इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यांची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे.

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत आहे. विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच या तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यास त्यांच्यात तर्कशक्ती, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होईल. AI(एआय) लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, प्रात्यक्षिके आणि कृतीआधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे, उपाध्यक्ष शुभांगी आंबीलढुके, माजी सरपंच महेश कलारे, किरण बरबटे, शैलेश कोपरकर, रामकृष्ण आंबीलढुके, योगेश निनावे, ठोसरे, चौरे,थोटे उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल गडपायले, शिक्षकवृंद रविंद्र घुगे, भारती साखरकर, परवीन शेख, प्रीती खंगार, शिल्पा उकुड्डे, नेहा निमजे, रुचिला खंडाईत, संगीता बालकोटे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीएमश्री योजनेंतर्गत उपलब्ध झालेली ही सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचे नवे दालन खुले करणारी ठरणार आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षणासाठी तयार होण्यास मदत होणार आहे.
चाचेर शाळेत AI(एआय) लॅब सुरू झाल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
“पीएमश्री योजनेअंतर्गत आपल्या चाचेर शाळेला AI लॅबची सुविधा उपलब्ध होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या लॅबमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान मिळण्यास मदत होईल. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भविष्यात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करावी आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच सहकार्य करेल.”
— जीवन सहारे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, चाचेर








