spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महामार्गावरील उडाणपुलाजवळ भीषण बस अपघात; चालकाचा मृत्यू, १० प्रवासी जखमी

– कन्हान–मनसर मार्गावरील अपघात; जख्मींना नागपुरच्या मेयो रुग्णालयात दाखल. 

कन्हान :- नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील डुमरी रेल्वे स्टेशन जवळील उडाण पुला जवळ मनसर कडुन कन्हानकडे येणाऱ्या मार्गावर उडाणपुलाचे बांधकाम सुरू असलेल्या स्थळी भीषण बस अपघात घडला. रस्त्याच्या खोदकामामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यात बस पलटी झाल्याने बस चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १० प्रवासी जख्मी झाले. जखमींना उपचारासाठी नागपुर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलीस स्टेशन कन्हानचे पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता हे दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपासुन दि. २८ ऑक्टोबर सकाळी १० वाजेपर्यंत दिवसपाळी अधिकारी म्हणुन कर्तव्या वर होते. दरम्यान मध्यरात्री ३.४५ वाजताच्या सुमारास डायल ११२ वर अपघाताची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठांना कळवुन स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. कन्हान–मनसर मार्गावर उडाणपुलाचे काम सुरू असुन त्यासाठी रस्त्यालगत अंदाजे चार ते पाच फूट खोल खड्डे खोदण्यात आला आहे. याच ठिकाणी खासगी बस क्रमांक एमएच-२७ बी एक्स – ६५२१ ही पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. अपघाता ची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बसचालक सुनील कुमार यादव वय ४० वर्षे , रा. खुर्शीपार, लखनादौन, जि. सिवनी, मध्य प्रदेश यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढुन १०८ रुग्णवाहिका तसेच एनएचआय च्या रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली. जख्मींना प्रथम कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णा लयात हलविण्यात आले.

दहा प्रवासी जखमी

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये १) मनीष पुरनलाल पटेल वय ३६ वर्ष रा. सोलगावा जि. जबलपुर २) आरती मनीष पटेल वय ३३ वर्ष रा. सोलगावा जि. जबलपुर ३) कु. आरव मनीष पटेल वय १२ वर्ष ४) अमितकुमार राजेश्वर अहीरवार वय ४१ वर्ष रा. लखनादौन ५) काजल अमितकुमार अहीरवार वय ४१ वर्ष रा. लखनादौन ६) श्वेता चंद्रकांत सेन वय ३५ वर्ष ७) चंद्रकांत अशोक कुमार सेन वय ३७ वर्ष ८) सुभाष कैलाशचंद्र विश्वकर्मा वय ५४ वर्ष रा. बुटीबोरी ९) शशीकांत शिवप्रसाद सरातिया वय ३५ वर्ष रा. खुर्सापार शिवनी १०) सुखमतीबाई शशीकांत सरातिया वय ३५ वर्ष रा. खुर्सापार शिवनी. यांचा समा वेश आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महामार्गावरील उडाणपुलाचे बांधकाम करणा ऱ्या मे. इन्फ्रा. प्रा. लि. या कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर भावनित सिंग आणि साइट इंजिनिअर तरुण कुमार यांच्यावर रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, दिशा दर्शक फलक आणि योग्य प्रकाश व्यवस्था नसल्यने हा अपघात घडला असुन महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्या मुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिसांकडुन पुढील तपास सुरू

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता यांच्या तक्रारीवरून बसचालक सुनील कुमार यादव, संबंधित कंत्राटदार कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर भावनित सिंग आणि साइट इंजिनिअर तरुण कुमार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कल मांनुसार कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या त आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस करीत आहेत.

Popular Articles