spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसींचा स्वतंत्र कॉलम हवा

– ३० ऑक्टोबरच्या सकल ओबीसी महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर :- ओबीसी संवर्गातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी सर्व शाखीय कुणबी समन्वय समिती व विविध ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय आकडेवारी उपलब्ध व्हावी आणि जनगणनेच्या अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, यासाठी सकल ओबीसी महामोर्चाच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. या मागणीला सर्व शाखीय कुणबी समन्वय समिती, विविध ओबीसी संघटना आणि इतर सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

राष्ट्रीय स्तरावर जनगणनेची प्रक्रिया सुरू होत असताना ओबीसी संवर्गातील जातींची स्वतंत्र जातनिहाय नोंद व्हावी, यासाठी जनगणनेच्या अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवून समाजाची जातनिहाय आकडेवारी संकलित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ओबीसी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय आकडेवारी उपलब्ध व्हावी आणि जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याच्या मागणीला बळ मिळावे, यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महामोर्चाचा मार्ग

हा मोर्चा चंडिका माता मंदिर, शहीद चौक, इतवारी, नागपूर येथून सुरू होऊन महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

या महामोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. याप्रसंगी पांडुरंगी वाकडे (पाटील) राजेश काकडे, दीपक कापसे, नितीन हांडे, महादेवराव बोराडे यांची उपस्थिती होती.

Popular Articles