spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अग्निशमन दलात अत्याधुनिक ८ नवीन फायर टेंडर दाखल शहरातील अग्निशमन व आपत्कालिन सेवा होणार अधिक सक्षम.

नागपूर, ता. 28  : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत  शहरातील आगीच्या घटनांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी विविध क्षमता असलेले ८ नवीन फायर टेंडर अग्निशमन ताफ्यात दाखल झाले आहे. तर उर्वरीत ६ मिनी फायर टेंडर लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. शहरात नव्याने सुरू झालेल्या वाठोडा, पुनापूर व पाचपावली अग्निशमन केंद्राकरीता १४ नवीन अग्निशमन गाड्या (फायर टेंडर) सेवा देणार आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या  क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली आहे. उंच तसेच दूरवरून पाण्याचा मारा करून आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळणार आहे.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या फायर टेंडरचे लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त  अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी  तुषार बाराहाते यांच्या नेतृत्वात अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण केले जात आहे. या अंतर्गत नवीन फायर टेंडर अग्निशमन दलात दाखल झाल्याने अग्निशमन विभागाला अधिक बळ मिळाले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभागाने खरेदी केलेल्या १४ फायर टेंडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि क्षमतांचा समावेश आहे. याची किंमत १६ कोटी ४९ लाख रुपये इतकी आहे. १६ हजार लिटर पाणी  वाहून नेण्याची क्षमता असलेले ५ वॉटर बाउजर खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये १००० फूट अंतरापर्यंत पाण्याचा मारा करण्याची सुविधा आहे. ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज साहित्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाणार आहे. याशिवाय ५ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेले ३ फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. जवळपास १००० फूट पाईप तसेच ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज अशी हे फायर टेंडर आहे. तर ६ मिनी फायर टेंडरची पाणी वाहून नेण्याची क्षमता २ हजार लीटर एवढी आहे. हे मिनी फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. ५०० फूट पाईप, ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज अशी  मिनी फायर टेंडर आत लहान अरुंद रस्त्यामध्ये जात असते.

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी, बाजारातील अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यातील आगीच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी हे फायर टेंडर अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. वेगाने होणारे शहरीकरण आणि वाढत्या उंच इमारती यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अग्निशमन विभागाला उभारी देण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. अत्याधुनिक फायर टेंडरमुळे अग्निशमन विभाग सक्षम बनला आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरात या नवीन फायर टेंडरमुळे आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.

 ७० मीटर हॅड्रोलिक प्लाटफॉर्म मशीन लवकरच ताफ्यात

अग्निशमन विभागाच्या नव्या 22 अग्निशमन केंद्राचा मास्टर प्लानमध्ये प्रामुख्याने गगनचुंबी इमारतींवर सेवा पोहोचविण्यासाठी अग्निशमन विभागाने फिनलॅण्ड येथून १३ कोटी१५ लाख रुपयांत ७० मीटर हॅड्रोलिक प्लॅटफॉर्म मशीन खरेदी केली असून, लवकरच ही यंत्रणा अग्निशमन दलाच्या ताफ्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे आता शहरातील एखाद्या ७० मीटर पर्यंत इमारतीतील आग नियंत्रणात आणता येईल. तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये या मजल्यावरील नागरिकांना सुरक्षितपणे खाली आणता येईल. सध्या अग्निशमन विभागाकडे ४२ मीटर  उंचीची १ टर्न टेबल लॅडर (टीटीएल) व ३२ मीटर उंचीची हॅड्रोलिक प्लाटफॉर्म (एचपी)मशीन, २ रॅपिड इंटरवेंशन व्हेइकल (आरआयवी),१  क्विक रिस्पॉन्स व्हेईल (क्युआरवी) आणि ४ बूलेट फायर फायटिंग बाईक सेवेत आहे. मनपाकडे १६हजार लिटरचे ७ वॉटर ब्राऊजर, ५ हजार लिटरचे १४ फायर टेंडर, ३हजार लिटरचे ४ मीनी फायर टेंडर असून यातील २ मिनी फायर टेंडर डम्पींग यार्डमध्ये आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय २ हजार लिटरचे ४ मिनी टेंडर सेवेत आहे. उर्वरीत २हजार लिटरचे ६ मिनी फायर टेंडर लवकर सेवेत दाखल होणार आहे.

अग्निशमन केंद्रांची संख्या पोहोचणार २२ वर

शहराच्या लोकसंख्येनुसार महानगरपालिकेचे १२ अग्निशमन केंद्र कार्यरत आहेत. नुकतेच पाचपावली अग्निशमन केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच जुने अग्निशमन केंद्रांचे नूतनीकरण देखील या वर्षात होईल.  आणखी १० अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. यात  बजाजनगर, अंबाझरी, नरसाळा, मानेवाडा,  चिंचभवन, दाभा, वायुसेनानगर, ठाकरे लेआऊट, वांजरा व वांजरी या भागांमध्ये नवी अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. यानंतर शहरातील एकूण अग्निशमन केंद्रांची संख्या २२ वर पोहोचणार असून प्रक्रिया सुरु लकडगंज येथे नव्या अग्निशमन केंद्राच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अत्याधुनिक सुविधायुक्त या अग्निशमन केंद्राच्या बांधकामावर १४.८९ कोटी खर्च करण्यात येणार असून प्रशासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच सध्या प्रशासनाने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता व अतिवृष्टी कालावधीची दखल घेत प्रशिक्षीत  68  अग्निशमन विमोचक/ इनर्टन्स 4 महिन्याच्या कालावधी करिता विशेष मानधनावर नियुक्त केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.