यवतमाळ :- भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार दुपारी १ वाजता पुसद जि. यवतमाळ येथे आगमन, दुपारी १.१५ वाजता पुसद येथे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी २ वाजता पुसद येथे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालय, पुसद येथे प्रस्तावित वकील भवनाच्या कोनशिला समारंभाला उपस्थिती, त्यानंतर ४.३० वाजता नागपूरकडे रवाना होतील.
पोहरादेवीत नगारा भवन व बंजारा विरासतला भेट देणार
माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता पोहरादेवी येथील नगारा भवन व बंजारा विरासतला भेट देतील. यावेळी त्यांच्यासोबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हेही उपस्थित राहतील.








