spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाखनीच्या करण वाघायेची आंतर विद्यापीठ कनोइंग-कयाकिंग स्पर्धेसाठी निवड

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे करणार प्रतिनिधित्व

हंसराज,लाखनी :- येथील स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी करण ज्ञानेश्वर वाघाये याची आंतर विद्यापीठ कनोइंग आणि कयाकिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन निवड चाचणीत करणने चांगली कामगिरी केली. त्या जोरावर त्याची नागपूर विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली. ही आंतर विद्यापीठ स्पर्धा १ नोव्हेंबर २०२६ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चंदीगड युनिव्हर्सिटी, मोहाली येथे होणार आहे.

करणच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. सुधीर सहारे यांनी त्याचे कौतुक केले असून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.

करणच्या या निवडीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोहाली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत करण चांगली कामगिरी करून नागपूर विद्यापीठाचे नाव उंचावेल, असा विश्वास महाविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Popular Articles