spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चक्क पूजाघरात आढळला अत्यंत विषारी रसेल वायपर!

– सैलाब नगरातील घटनेने कुटुंबीयांमध्ये खळबळ; सर्पमित्र अनिल बोरकर यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

कामठी :- घरातील पूजाघर म्हणजे श्रद्धा आणि शांततेचे स्थान; मात्र याच पूजाघरात तब्बल पाच फूट लांबीचा अत्यंत विषारी रसेल वायपर साप आढळल्याने सैलाब नगर परिसरात खळबळ उडाली. घरात शिरलेला हा विषारी साप पाहून कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. मात्र, सर्पमित्राने वेळीच घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याने संभाव्य अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, कामठी येथील सैलाब नगर परिसरात रहिवासी असलेल्या बंटी गायकवाड यांच्या निवासस्थानी हा प्रकार घडला. काल दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या एका बालकाला घरातील पूजाघरात साप लपून बसल्याचे दिसून आले. पूजाघरातच विषारी साप आढळल्याची माहिती घरातील सदस्यांना मिळताच सर्वजण हादरून गेले. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य तथा सर्पमित्र अनिल बोरकर यांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी कौशल्याने सापाला सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Popular Articles