– आनंद नगरात ‘युवावेध’ संस्था चे बहरदार आयोजन
नागपूर :- ‘युवावेध’ बहुउद्देशीय संस्था, नागपूरद्वारे संचालित आरोही म्युझिक अकॅडमीच्या वतीने स्व. लता मंगेशकर व स्व. स्नेहा तायडे यांच्या जयंतीनिमित्त ‘मेरी आवाज ही पहचान है’ या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन आनंद नगर मंदिर हॉल, तिरंगा चौक येथे करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. संगीता बानाईत (अध्यक्ष, कला गौरव संस्था), मधुकर दहीकर (उपाध्यक्ष, आनंद ज्येष्ठ नागरिक मंडळ) व काशीनाथ ठवरे (सचिव) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्व. स्नेहा तायडे (संस्थापक, आरोही म्युझिक अकॅडमी) यांच्या कार्याचा आढावा डॉ. राजेंद्र जाने (माजी प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, भिसी) यांनी प्रास्ताविकातून घेतला. डॉ. संगीता बानाईत यांनी गीत सादर केले, तर मधुकर दहीकर यांनी सर्व गायक कलाकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात शारदास्तवनाने झाली. त्यानंतर आरोही म्युझिक अकॅडमीच्या सदस्यांनी विविध हिंदी-मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण केले.
यावेळी उन्हाळी गायन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभिक परीक्षा (गायन) मध्ये. सेजल घुमडवार, वनिता महंत व सुनील महंत यांनी यश मिळविले. प्रवेशिका प्रथम (गायन) मध्ये मैथिली मनीष निंबाळकर व ऋतुजा महाजन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. प्रवेशिका पूर्व (गायन) मध्ये. रसिका राजेंद्र जाने, सारिका मनीष निंबाळकर, योग शिक्षक प्रा. सुनील जयस्वाल व डॉ. राजेंद्र जाने यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यांचे गायन, यांचे परिश्रम
कार्यक्रमात श्रुती चांदले, शिवेन घुगुसकर, एड. राजू घुगुसकर, डॉ. वैशाली शिरभाते, मालती मडावी, संजय घुमडवार, पूजाताई जगताप, रंजना मडावी, सुमेध तायडे यांच्यासह अन्य १५ सदस्यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा भोंडे व एड. अनंत घुलक्षे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अकॅडमीचे संचालक अनुप तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष धपके, प्रवीण रंभाड, मीनाक्षी रंभाड, प्रकाश पाठराबे व आरोही तायडे यांनी परिश्रम घेतले.








