spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त खापा पोलिसांची ‘रन फॉर युनिटी’, नागरिक, विद्यार्थी व पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; एकता आणि बंधुभावाचा दिला संदेश

खापा, वार्ताहर :- राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त खापा पोलीस स्टेशनच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ अर्थात एकता दौडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात शहरातील नागरिकांसह विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

खापा पोलीस स्टेशन येथून एकता दौडीला सुरुवात झाली. नवीन वस्ती व माईन मार्गे मार्गक्रमण करीत पुन्हा पोलीस स्टेशन येथे दौडीचा समारोप करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ मान्यवर, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पोलीस पाटील, होमगार्ड, पोलीस मित्र, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवणे, सामाजिक सलोखा वाढविणे आणि समाजात बंधुभावाची भावना दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सर्वांनी एकत्र येत उत्साहाने सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड, नितेश चिपडे, श्याम सोलंकी, परवेज शेख, पंकज ठाकूर, मनिराम नेवारे, सपना इंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles