– साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान :- साईबाबा आश्रमशाळा येथे मागील वर्षी मंदीर बांधुन साईबाबा यांच्या मुर्तीची स्थापना करण्या त आली. यावर्षी साईबाबा मुर्ती स्थापनेचा वर्ष सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी मिरवणुक काढुन भव्य महाप्रसादाने थाटात संपन्न करण्यात आला.
शनिवार (दि.३१) ऑक्टोबर २०२६ ला साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को. ख.) येथील साईबाबा मंदीरात सकाळी ८ वाजता साईबाबा मुर्तीचा अभिषेक, पुजन आणि आरती करून साईबाबा मुर्ती स्थापनेचा वर्ष सोहळा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. दुपारी १.३० वाजता साईबाबा यांचे भजन व किर्तन करून दुपारी गोपालकाला प्रसादाचे वितरण करण्यात आले.

सायंकाळी ५.३० वाजता ढोल ताश्याच्या गजरात, महिला भजन मंडळी, विद्यार्थ्यांनी ” साईबाबा” चा जय जयकार करित साईबाबा यांची पालखी मिरवणुक काढुन महामार्गावरील पटबंधारे वसाहतीच्या साईबाबा मंदीरात पुजा, अर्चना करून परत पालखी मिरवणुक आश्रमशाळेतील मंदीरात येऊन महिला भजन मंडळी ने भजनाच्या तालावर नाचत सुंदर भजने सादर केली. तदंतर कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवर मंड ळीचे शाळेचे संचालक किशोर वानखेडे आणि हर्षा किशोर वानेखेडे हयांनी श्रीफळ व शॉल देऊन स्वागत केले. सायंकाळी ८ वाजता साईबाबा मंदीरात आरती करून शालेय विद्यार्थ्यासह उपस्थित सर्वाना स्नेहभोज व भव्य महाप्रसाद वितरण करून साईबाबा मुर्ती स्थापनेचा वर्ष सोहळा थाटात संपन्न करण्यात आला. कार्य क्रमाच्या यशस्वि आयोजनार्थ साईबाबा आश्रमशाळा टेकाडी तह. पारशिवनी, जि. नागपुरचे संचालक किशोर रा. वानखेडे व हर्षा किशोर वानखेडे आणि समस्त वानखेडे परिवार तसेच मुख्याध्यापक संजय काळे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रफुल बालपांडे, शिक्षक निखाडे, डाहाके , चौधरी, डोंगरे , सातपुते, चव्हाण, यावले, खिड्डेकार, सरोदे , मंहत, कदम, कापसे, शेंडे, खंगार, अनिल वानखेडे, नरूले, चव्हाण, खौरे, पाटील, देशमुख, आत्राम शिक्षकेत्तर कर्मचारी चंदु चौधरी, रंजित पाजुर्णे, गणेश हुड, उमेश चापले, अजाब लक्षणे सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.








