किशोर साहू, मौदा :- शनिवार ( ता. ३१ ऑक्टोबर)ला ग्रामपंचायत कार्यालय, चाचेर येथे भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच भारत देशाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मुर्तीला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लुंबिनी महेश कलारे होत्या. त्यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, प्रकाश वाक्कलपूडी, सुरेंद्र टेभरे,सदस्या चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर, नलू दरवई, सविता जांभरे, ममता चौरे व ग्रामपंचायत लिपिक चंद्रशेखर देवगडे, रामानंद खडसे, आकाश राऊत यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी उपस्थित सर्व सदस्य व कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.








