किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार (ता.30 ऑक्टोबर)ला कोदामेंढी येथील वार्ड क्रमांक २ मधील आदर्श चौक स्थित राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई मंदिर समोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, पूजा अर्चना करून व त्यांच्या विचारावर प्रकाश टाकून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भैय्या बावनकुळे, कवडु बारई, लालू बडवाईक, नरेश हटवार, रुपेश बडवाईक, निलेश बावनकुळे, लहानू बावनकुळे, वासुदेव बावनकुळे, भगवान मसराम, चेतन तरटे, चिंतेश्वर ढोमणे, नत्थू ठाकरे, शिवम बावनकुळे, पवन वाघमारे, दीपक तलमले, कान्हा चौकसे, देविका बावनकुळे, नंदा वाघमारे, प्रिया बडवाईक, निकिता बावनकुळे, द्रोपदी चौकसे सह पहाटेच्या वेळेस दररोज राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई मंदिरात काकड आरतीला येणारे गावातील भाविक मंडळी उपस्थित होते .








