किशोर साहू, मौदा :- तारसा – माथनी जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत धामणगाव अंतर्गत येणाऱ्या धामणगाव येथे वाचनालयाचा भव्य शुभारंभ सोहळा नुकताच थाटात पार पडला.
या शुभ प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका करंडे यांच्या शुभहस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी धामणगाव गट ग्रामपंचायत सरपंच अक्षय पंचबुधे,उपसरपंच राकेश मोटघरे,गट ग्रामपंचायत धामणगांव/कुंभारी येथील सर्व सदस्यगण,पोलीस पाटील मंगेश मोटघरे, माजी उपसरपंच नरेंद्र भोयर, माजी ग्रा.प. सदस्य सचिन मोटघरे, माजी ग्रा.प. सदस्या संगीता जुमळे, कैलास मोटघरे, मनोज मोटघरे, शिक्षक प्रशांत मोटघरे , पंकज मांदाडे, दीपक केदार ,मधुकर हटेवार, रविशंकर जुमळे, दिलीप मोटघरे, सुभाष केदार, सुखदेव जुमळे,युवाशक्तीचे पदाधिकारी मयूर ठाकरे, संकेत पंचबुधे, जितेंद्र माटे, देवाजी संतापे, सौरभ कातुरे, मंगेश सारवे, प्रफुल्ल जुमळे, मयूर हिंगे, प्रितेश राऊत, निखिल भोयर, आकाश पंचबुधे, हरिओम पंचबुधे, राकेश पंचबुधे, अनिल माटे, अक्षय जुमळे, कौशिक मोटघरे, प्रियांशु मोटघरे, चेतन पंचबुधे शुभम केदार, आशिष पंचबुधे, कोमल माटे,यासोबतच गावातील जेष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हे वाचनालय उभारण्यासाठी ग्रामसेवक नीकुरे व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले हे विशेष!
“हे वाचनालय फक्त पुस्तकांचे नाही, तर धामणगावच्या उज्ज्वल भविष्याचे मंदिर आहे”, अशी प्रतिक्रिया सरपंच अक्षय पंचबुद्धे यांनी याप्रसंगी दिली.








