spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपच्या ५ नोव्हेंबरच्या मोर्चावर काँग्रेसची टीका; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

– निवडणूक आयोगाच्या कारभारावरून पटोले यांचा भाजपवर आरोप

हंसराज, भंडारा :- मुख्य निवडणूक आयोगावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत, त्यामुळे आयोगाने आम्हाला उत्तर द्यायला हवे, असे मत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले. आयोगाच्या समर्थनार्थ भाजप आता रस्त्यावर उतरत असल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

पटोले यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने तसेच निवडणूक आयोगानेच फॉर्म क्रमांक सहा आणि एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे. भाजप लोकशाही संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत बोलताना पटोले म्हणाले, की आयोगातील दोन सदस्यांचा विरोध असतानाही त्यांनी मनमानी केली आणि लोकांची मते गायब केली, असा त्यांचा आरोप आहे. अशा व्यक्तीच्या पाठीशी भाजप उभा राहत असेल, तर त्यावरून भाजप संविधानविरोधी असल्याचे स्पष्ट होते, असे पटोले यांनी म्हटले आहे.

Popular Articles