spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुरात १२ सराफांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर :- चित्रपट अभिनेता सलमान खाननंतर टायगर श्रॉफ वर गोळीबार करणाऱ्या कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने शहरातील १२ सराफा व्यावसायिकांना लाखोंची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सराफा व्यावसायिकांना गेल्या काही तासांच्या अंतरात एका पाठोपाठ एक टपालाद्वारे मिळालेल्या या धमकीच्या पत्रानंतर रविवारी हा प्रकार उघडकीस आला. एन दिवाळीच्या तोंडावर मिळालेल्या या धमकीच्या पत्रामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

नेमके काय आहे धमकीच्या पत्रात….

इतवारी येथील सराफा ओळ आणि बजाजनगरातील काही सराफा व्यावसायिकांनाही काही तासांच्या अंतरात एका मागे एक धमकीच्या आशयाचे पत्र मिळाले. वहिच्या कागदावर हस्ताक्षरात लिहिलेली ही पत्रे टपालाद्वारे सराफा व्यापाऱ्यांना पाठवण्यात आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत धमकी देणाऱ्याने सराफा व्यावसायिकांना दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. यात धमकी देणाऱ्याने व्यापाऱ्यांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. या काळात पैशांची व्यवस्था केली नाही तर आप्तेष्टांसह त्याची किंमत मोजावी लागेल, तुम्ही कलियुगातले कौरव आहात. जसा टायगर श्रॉफवर गोळीबार केला तसात तुमच्यावरही करेल. मी आतापर्यंत चार खून केले आहेत. पोलीसांना मदत मागाल तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशा आशयाचा मजकूरही धमकी देणाऱ्याने हस्ताक्षरात लिहिला आहे.

सराफा संघटनेची पोलीस आयुक्तांशी चर्चा…

नागपूर जिल्हा सराफा व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेश रोकडे यांनी तडकाफडकी या संदर्भात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांना धमकीच्या पत्राची प्रत सादर केली. सराफा असोसिएशनने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करत सुरक्षेचीही मागणी केली.

बिष्णोई टोळीकडून यापूर्वीही धमकी

प्रतापनगर पोलीस हद्दीतील रहिवासी एका बाप- लेकीला कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीने अलिकडे खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली होती. सेवानिवृत्त शिक्षकाची मुलगी कॅनडा येथे स्थायिक झाली आहे. तिच्या ई मेलवर बिष्णोई टोळीने संदेश पाठवून धमकी दिली होती.

Popular Articles