spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

…. अखेर कोदामेंढी येथील मुख्य रस्ता झाला गुळगुळीत 

– भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष तथा तत्कालीन ग्रा पं कोदामेंढी सरपंच भगवान बावनकुळे यांच्या सतत पाठपुराव्याला यश 

कोदामेंढी परिसरातील वाहनधारक, विद्यार्थीवर्ग, रुग्ण, बँकेचे खातेदार व नागरिकांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर यांचे मानले आभार

किशोर साहू, मौदा :- मागील दहा वर्षांपूर्वीपासून कोदामेंढी येथील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली होती. कोदामेंढी येथे मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार, बैल बाजार,प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडिया, जि प कनिष्ठ महाविद्यालय, दोन कॉन्व्हेंट असल्याने परिसरातील चाळीस गावांचे नागरिकांचे दररोज आवागमन असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे गावातीलच नव्हे तर परिसरातील वाहनधारकांसह, शाळा, कॉन्व्हेंट व महाविद्यालयात येणारे विद्यार्थीवर्ग, बँक शाखेत येणारे खातेदार, प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण कमालीचे त्रस्त होते. याबाबत तत्कालीन सरपंच तथा सध्याचे भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे यांनी सतत पाठपुरावा करून तत्कालीन आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडून या मुख्य रस्त्यासाठी १ करोड रुपये तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून १ करोड १० लक्ष रुपये दोन टप्प्यात या खडबडीत मुख्य रस्त्यासाठी मंजूर होऊन कामही नुकतेच पूर्णत्वास होऊन आवागमन सुरू झाल्याने अखेर कोदामेंढी येथील मुख्य रस्ता गुळगुळीत झालेला आहे.

दिवाळी पंचमी निमित्त दरवर्षी पाहुण्यांचे आगमन याच खडबडीत रस्त्याने होत होते. मात्र यंदा पंचमी निमित्त १४ व १५ नोव्हेंबरला दोन दिवसीय मंडई उत्सवाला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत गुळगुळीत रस्त्याने होणार असल्याने व काही पाहुण्यांचे आगमन झालेले असून, त्या पाहुण्यांनी, गावातील व परिसरातील विद्यार्थी वर्ग, रुग्ण, बँकेचे खातेदार, वाहनधारक यांनी कोदामेंढी येथील मुख्य रस्ता गुळगुळीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर सह या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सतत पाठपुरावा करणारे तत्कालीन सरपंच तथा भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे यांचे आभार मानले आहे.

Popular Articles