spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिवाळी व भाऊबीजे निमित्त जिल्ह्यातून ग्राम समृद्ध गाव चे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १ करोड मिळवलेल्या धानला येथे भव्य मंडई व आमदंगल कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

किशोर साहू, मौदा :- बुधवार (ता.११ नोव्हेंबर) ला दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी व भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर दिवाळी व भाऊबीज निमित्त जिल्ह्यातून ग्राम समृद्ध गावचे प्रथम पारितोषिक १ करोड मिळवलेल्या धानला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मंडई व आमदंगल कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी कुस्तीच्या आखाड्यात उतरलेल्या नामांकित पहेलवान बंधूंचे दमदार डावपेच, अफलातून कौशल्य आणि चित्तथरारक कुस्त्यांचा उपस्थित आणि मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक करून सर्व पहेलवान बंधूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका समन्वय समिती अध्यक्ष नरेश मोटधरे, चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा ग्रामीण (रामटेक) उपाध्यक्ष संजू वाघमारे सह तालुक्यातील मान्यवर नेतेमंडळी, आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, मौदा तालुक्यातील विविध गावांतून आलेले नागरिक तसेच स्थानिक तरुण युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles