– ‘एसआयआर’ मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
मुंबई :- एसआयआर मोहिमेमध्ये नोटीस बजावण्यात आलेल्या सव्वा कोटीहून अधिक मतदारांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. कागदपत्रांचे योग्य पुरावे दिल्यानं तब्बल 99.94% टक्के म्हणजेच 1 कोटी 22 लाखांहून अधिक मतदारांची नाव प्रारूप मतदार यादीमध्ये पुन्हा समाविष्ट केली जाणार आहेत, अनेक जिल्ह्यांमधील मतदारांनी वेळेत कागदपत्र सादर केल्यानं आता त्यांचा 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम यादीमध्ये समावेश होण्याचा मार्ग पूर्णतः मोकळा झालेला आहे. एसआयर मध्ये सव्वा कोटी मतदारांना हा मोठा दिलासा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
SIR मोहिमेत नोटीस बजावलेले 1.22 कोटी मतदार पुन्हा यादीत येणार आहेत. 99 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी नोटीशीला उत्तर देऊन समाधानकारक कागदपत्रे सादर केल्याने बहुतांश जणांचे प्रारूप मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यात आलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, SIR अंतर्गत राज्याच्या मसुदा मतदार यादीत विसंगती किंवा नाव चुकीचे असलेल्या 1.2 कोटी मतदारांपैकी 99 टक्के मतदार छाननीत उत्तीर्ण झाले असून, त्यांना प्रारूप मतदार यादीत कायम ठेवण्यात येणार आहे. अंतिम SIR मतदार यादी 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत नोटीस बजावण्यात आलेल्या 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांपैकी 99.94 टक्के म्हणजेच साधारण 1 कोटी 22 लाख 16 हजार 665 मतदारांचे नाव प्रारूप मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहे. कागदपत्रांचे पुरावे दिल्याने त्यांचे नाव पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. एसआयआर’ मोहिमेंतर्गत प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असलेल्या 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांना आयोगाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
पुण्यात मतदारांचे पत्ते परस्पर बदलले; निवडणूक आयोगाची पोलिसांत तक्रार
पुण्यातील मतदारांचे पत्ते परस्पररित्या बदलल्याचं समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. त्याचबरोबर पत्ते कोणी बदलले याची चौकशी निवडणूक आयोग स्वतः देखील करणार आहे. हे पत्ते बदलल्याने अनेक मतदार 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहिले होते. 2024ची जी विधानसभेची निवडणूक होती जी नोव्हेंबर महिन्यात झाली होती, त्याच्या काही दिवस आधी म्हणजे 2024च्या ऑक्टोबर महिन्यात अचानक काही मतदारांचे पत्ते बदलण्यात आले, आणि जे मतदार पुण्यात राहतात, जे पुण्याचे नागरिक आहेत, त्यांचे पत्ते अचानक ठाणे, नाशिक असेल किंवा इतर शहर असतील या ठिकाणी नोंदवण्यात आले, आणि हे पत्ते अशाप्रकारे बदलल्यामुळे या मतदारांना या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करता आलं नाही.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अजित गव्हाणे यांनी ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. आठ ठिकाणाहून अहवाल मागवण्यात आले आणि त्यानंतर हे सिद्ध झालं की हे मतदार तर पुण्यातच आहेत, जे त्यांनी पुढे सोडलेलंच नाही, मग हे पत्ते बदलले कोणी तर चार मोबाईलच्या माध्यमातून हे पत्ते बदलण्यात आले होते, हे मोबाईल कोणाचे आहेत, त्या व्यक्ती कोण आहेत, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही, निवडणूक आयोगाने पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, स्वतः देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते, आहे आणि याला पार्श्वभूमी आहे ती देशभरात आपण निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आणि मतदार याद्या बद्दल जे काही वातावरण आहे त्याची आणि त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब म्हणून समोर आलेली आहे, तक्रार जरी दाखल करण्यात आलेली असली तरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, पोलीस याबद्दल खरच काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.






