पुणे :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा कुऱ्हाडीने निघृण खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी हा निकाल दिला. मुलीने निर्भिडपणे वडिलांविरोधात दिलेली साक्ष, आरोपीने तिच्याकडे दिलेली गुन्ह्याची न्यायबाह्य कबुली आणि त्याच्या डोक्यावर, मानेवर वार केल्याने गंभीर जखमी होऊन विवाहितेचा जागीच मृत्यू: वडिलाविरोधातील मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची शर्टवरील रक्त पत्नीचे असल्याचा ‘डीएनए’ अहवाल दोषसिद्धीत महत्त्वाचा पुरावा ठरला.
शवविच्छेदनात मृत पत्नीच्या शरीरावर दहा ठिकाणी वार केल्याच्या आणि चार ठिकाणी कापल्याच्या जखमाआढळून आल्या होत्या. पत्नीचे रक्षण करणे आणि तिची काळजी घेणे ही पतीची जबाबदारी आहे. मात्र, आरोपीने स्वतःच्या पत्नीवर कुऱ्हाडीने अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. त्यामध्ये डोक्यावर, मानेवर आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर अनेक गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. जखमांची संख्या आणि त्यांची तीव्रता हल्ल्याचे क्रूर स्वरूप दर्शविते. या गुन्ह्यामुळे मानवी जीवाचा बळी गेला असून, मृत महिलेच्या कुटुंबाचे अपरिमित नुकसान झाले आहे. असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला.
बाबासाहेब मारुती जाधव (वय ५३, रा. बुरकेगाव, हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पत्नी लक्ष्मीचा खून केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत त्यांच्या मुलीने तक्रार दिली होती. ही घटना २३ जुलै २०२४ रोजी आरोपीच्या घरी घडली.






