spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही : केशव महाराज

नरखेड :- आत्महत्या हा कोणत्याही संकटावर उपाय नसून प्रतिकूल परिस्थितीत निराश न होता धैर्य आणि संयम राखणे आवश्यक आहे. दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा योग्य वापर आणि मनातील जिद्द महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. केशव महाराज भुजाडे यांनी केले.

नरखेड तालुक्यातील थाटूरवाडा येथे बाल लक्ष्मी उत्सव मंडळाच्या वतीने ११ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठ आणि भारुडाने झाली. कीर्तनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिषेक कालमेघ, करण संतापे, प्रतीक ढोके, महेश ठाकरे, नयन कालमेघ, समीर ढोके, काल्पनिक कुडे, विकास कुडे, सचिन येमदे, राहुल गौरखेडे, राणा संतापे, जय कालमेघ, जय निकोसे, प्रतीक कुडे, बालू हणवते, लीलाधर कुडे, अमोल लोखंडे, हरीश येमदे, आदेश कुडे, सुजित कुडे, वंश कालमेघ, तेजस ठाकरे, यतीश गेडाम, विनोद येमदे, प्रथमेश राहटे, रत्नाकर ढोके यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

दरम्यान, मंडळाच्या वतीने १८ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular Articles