– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. 08 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान उपद्रव शोध पथकाने 277 प्रकरणांची नोंद करून 1 लाख 13 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला.
सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी /उघडयावर मलमुत्र विर्सर्जित करणे या अंतर्गत 08 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 119 प्रकरणांची नोंद करून 47,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणाची नोंद करून 300 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 24 प्रकरणाची नोंद करून 9,600 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 12 प्रकरणाची नोंद करून 24,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे. अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसुली करण्यात आली. (मनपाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे), चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. बायो.मेडिकल वेस्ट (जैव.वैद्यकीय कचरा) नियम १९९८ (१४) अंतर्गत सामान्य कचऱ्यामध्ये जैव. वैद्यकीय कचरा आढळून आल्याबद्दल 1 प्रकरणाची नोंद करून रू. 25,000 दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 11 प्रकरणाची नोंद करून रू.55,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे 03 प्रकरणांची नोंद करून रू.30,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे 03 प्रकरणांची नोंद करून रू. 15,000 चे दंड वसुल करण्यात आले. अनधिकृतपणे बोरवेलचे काम करणे, पिठगिरणी व जुन्या इमारतीला पाडण्याचे काम इत्यादी कारणाने वायु प्रदुषण होत असल्याने 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 22 प्रकरणांची नोंद करून रू.1,45,000 दंड वसुल केला.






