spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परिवहन समिती सभापतींसह कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

– मनपाद्वारे वृक्षारोपण अन् रक्तदान शिबिरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागपूर :- पर्यावरण संवर्धनासह सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सोमवार (ता. १६) रोजी पीएमआय शहर बस डेपो, वाठोडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी स्वतः रक्तदान करीत इतर कर्मचाऱ्यांना देखील रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, नगरसेविका अर्चना पडोळे, मनपाचे प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, परिवहन विभागाचे राजीव घाटोळे, चलो चमू,पीएमआय चमू तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्वप्रथम बस डेपो परिसरात मान्यवरांच्या हस्ते 36 रोपांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. तसेच, यावेळी परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान करत इतरांना प्रोत्साहित केले. त्यांच्या या आवाहनात्मक कृतीला प्रतिसाद देत आयोजित रक्तदान शिबिरात परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि बस चालकांनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत 41 बॉटल्स रक्तदान केले.

Popular Articles