किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी येथील वार्ड क्र. २ मधील झेंडा चौकात आदिवासी क्रांतिकारी जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांची १५१वी जयंती त्यांच्या फोटोला माल्यार्पण, अभिवादन व उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, बोरी (घिवारी) सरपंच विशाल सेलोकर, कोदामेंढी उपसरपंच गोपाल गिरमेकर, तुलसीदास वरखडे, इसीराम वरखडे, भुरस्या पंधरे सह आदिवासी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest News
Related Posts
कोदामेंढी येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी






