spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रोहित पवारांची भूमिका पक्षाची अधिकृत आहे का? नितेश राणेंचा सवाल

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रकार परिषदेवरून मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. “रोहित पवार यांनी मांडलेली ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, याचा खुलासा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी करावा,” अशी मागणी नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

मंत्री नितेश राणे म्हणाले, “शरद पवार यांचे आजवरचे राजकारण पाहिले तर त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी आणि वैयक्तिक संबंध नेहमीच जपले आहेत. मात्र, रोहित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीची भाषा वापरली, ती पाहता यांच्यात खरोखरच पवारांचे संस्कार आहेत का, असा प्रश्न पडतो. त्यांच्या पत्रकार परिषदेने राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनाही मागे टाकले आहे.”

जुन्या मदतीची आठवण करून देत प्रश्न

यावेळी नितेश राणे यांनी रोहित पवार यांना जुन्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींची आठवण करून दिली. “रोहित पवार यांनी अजित पवार यांचा नेहमीच द्वेष केला आणि त्यांच्याबद्दल एकेरी भाषेत वक्तव्ये केली. स्वतः रोहित पवार यांनी ‘VSR’ कंपनीच्या विमानातून किती वेळा प्रवास केला आहे, हे त्यांनी सांगावे. तसेच, एमपीएससी आंदोलनासह इतर अनेक प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली आहे. या मदतीची किमान जाणीव तरी त्यांनी ठेवायला हवी होती,” असे राणे म्हणाले.

Popular Articles