spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रदूषित विहिरींना पुनरुज्जीवित करा : शिवानी दाणी-वखरे

– संभाव्य पाणी टंचाईवर आवश्यक उपाययोजना आणि जागरूकता करण्याचे बैठकीत निर्देश

नागपूर :- शहरात उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना आणि पाण्याचा योग्य वापर व नियोजन करण्यासंदर्भात स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या अध्यक्षतेत महत्वाची बैठक बुधवारी (ता.१८) पार पडली.

मनपा मुख्यालयातील स्थायी समिती कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत जलप्रदाय विशेष समिती सभापती  दिव्या धुरडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, सुनील उईके, अनिल गेडाम, उपअभियंता राजीव गौतम यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी शहरातील विविध सार्वजनिक विहिरींची स्वच्छता व संबंधित आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याचे अपव्यय टाळावा तसेच उन्हाळ्यात वाढत्या पाण्याच्या वापर व संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीत लागणाऱ्या व्यवस्थांसाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश शिवानी दाणी वखरे यांनी दिले.

याशिवाय बैठकीत शहरातील विविध सार्वजनिक विहिरींच्या स्वच्छतेची माहिती देण्यात आली. संभाव्य पाणी टंचाई बघता पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त नागरिकांना वापरासाठी लागणाऱ्या इतर पाण्याचे अधिक स्रोत उपलब्ध व्हावे, यादृष्टीने प्रदूषित विहिरींना शुद्ध करण्यासाठी आवश्यक दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही चर्चा करण्यात आली. यावर स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी शहरातील विहिरींची स्वच्छता करण्यासह प्रदूषित विहिरी पुनरुज्जीवित करणे, सार्वजनिक विहिरीतील पाण्याची गुणवत्ता चाचणी करून गुणवत्तेनुसार नागरिकांना त्या पाण्याचा वापर करण्यासाठी उपलब्ध करण्याच्या सूचना केली. लघुनळ योजनेच्या माध्यमातून शहरातील १०० विहिरींना जोडत नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त लागणाऱ्या पाण्याची व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील विविध झोननिहाय असलेली पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती आणि दीर्घकाळात आवश्यक पाण्याची व्यवस्था यावर झोन निहाय अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. संभाव्य पाणी टंचाईला लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर इतर ठिकाणी होऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना केली.

Popular Articles