spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बारावी परीक्षा : अर्थशास्त्र विषयाच्या वेळेत बदल

नागपूर :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.आधी घोषित वेळापत्रकानुसार बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर १७ फेब्रुवारी २०२७ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात होणार होता. आता हाच पेपर १७ फेब्रुवारी रोजीच दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात होणार आहे. या बदलाव्यतिरिक्त बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या अंतिम तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाटसप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चे सचिव डॉ. दीपक माळी यांनी कळविले आहे.

Popular Articles