– ॲड. बुरहानुल हसन शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित; सर्व स्तरांतून अभिनंदन
नागपूर :- स्टेप वन टेक्नॉलॉजीज कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळवून देण्यात शिवसेना जनसेवा केंद्राला यश आले आहे. शिवसेना कायदे विभाग, पूर्व विदर्भचे अध्यक्ष ॲड. बुरहानुल हसन शेख तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्टेप वन टेक्नॉलॉजीज कंपनीतील कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले होते. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना जनसेवा केंद्राच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहणे, ही ॲड. बुरहानुल हसन शेख यांची कार्यशैली राहिली आहे. गरजू आणि दुर्बल घटकांना मदत करण्याच्या त्यांच्या सेवाभावी भूमिकेचे या निमित्ताने पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
या यशस्वी पाठपुराव्याबद्दल ॲड. बुरहानुल हसन शेख आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी शिवसेना जनसेवा केंद्राने केलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे शिवसेना जनसेवा केंद्राच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असेच कार्य सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






