spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध दारू धंद्यांवर पोलिसांचा दणका; ८ गुन्हे दाखल

नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती, विक्री तसेच दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०८ गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस स्टेशन खापा येथे आरोपी नामे १) दिनेश मनोहरजी मानकर, वय ३० वर्षे, रा. बावनगाव २) राधेश्याम हिरालाल उपरेड, वय ३७ वर्षे, रा. कोथुळणा खापा सावनेर यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद. पोलीस स्टेशन वडोदा येथे आरोपी नामे दशरथ किशन कुंभले, वय ३५ वर्ष, रा. वार्ड क ०२, रा. भूगाव, ता. कामठी याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन देवलापार येथे आरोपी नामे बलदेव सुमरलाल टेकात, वय ४८ वर्ष, रा. पवनी, ता. रामटेक याचेवर ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आरोपी नामे १) राजेश मेघनाथ पवार, वय ४६ वर्ष, रा. उमठा, ह. मु मालटेकडी २) भानुदास तुकाराम सोनोने, वय ६० वर्ष, रा. खरबडी ३) राजेश भुजल सोलंकी, वय ३६ वर्ष, रा. उमठा यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०३ गुन्हे नोंद. पोलीस स्टेशन नरखेड येथे साहेबराव चैतराम मसराम, वय ४९ वर्ष, रा. पिठोरी, तह. नरखेड याचेवर ०१ गुन्हा नोंद.

Popular Articles