– मुंबई-नागपूर ८ सेवा, कधी सुटणार-कुठे थांबणार?
मध्य रेल्वेद्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दिनांक ०४.१२.२०२६ ते दिनांक ०८.१२.२०२६ या कालावधीत विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने १५ अनारक्षित विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (४ सेवा), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर (४ सेवा), दादर ते नागपूर (१ सेवा), कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कलबुर्गी (२ सेवा), अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती (२ सेवा), कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर (२ सेवा) असे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
नागपूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष सेवा
नागपूरहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ४ डिसेंबरला नागपूरहून सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल. याच दिवशी रात्री ११.५५ वाजता सुटणारी दुसरी गाडी ५ डिसेंबरला दुपारी ४.१५ वाजता पोहोचेल. ५ डिसेंबरला सकाळी ७.४० वाजता सुटणारी गाडी त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल. तर सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी गाडी ६ डिसेंबरला सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर विशेष सेवा
मुंबईहून नागपूरसाठी चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६ डिसेंबरला रात्री ८.२५ वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल. ७ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.५५ वाजता, तर त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता सुटणारी गाडी ८ डिसेंबरला पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल. ८ डिसेंबरला मध्यरात्री १२.२५ वाजता सुटणारी गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता दादरहून सुटणारी विशेष गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
कुठे थांबणार?
नागपूर-मुंबई मार्गावरील ट्रेनना दोन्ही बाजूंनी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे देण्यात आले आहेत. अनारक्षित डब्यांचे तिकीट सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे तसेच रेलवन ॲपवरून काढता येणार आहे.
– ट्रेन क्रमांक ०१२५३ दादरहून ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
– थांबेः कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मैलकापूर, नांदुरा, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.






