spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

किशोर साहू:मौदा :- विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, राष्ट्रप्रेम आणि नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे गुरुवार(ता. २६ नोव्हेंबर ) ला संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी “आम्ही, भारताचे लोक…” ही प्रस्तावना एकाग्रतेने, समजपूर्वक आणि योग्य उच्चारांसह वाचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगण्यात आले.

या निमित्ताने शाळेत चित्रकला स्पर्धा तसेच संविधान अभ्यास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान मसुदा समितीच्या योगदानावर प्रकाश टाकत मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

‘माझे संविधान, माझा अभिमान’, ‘लोकशाहीचे स्तंभ’ आणि ‘एकता व बंधुता’ या विषयांवर प्राथमिक गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी रंगकाम आणि रेखांकनाच्या माध्यमातून संविधानाची उद्दिष्टे आणि भारतीय संस्कृतीचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाप्रती आदर आणि जागरूकता निर्माण झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

याप्रसंगी केंद्रप्रमुख राजु आंबिलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अंकुश निरगुळकर, उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य, मुख्याध्यापिका कु. पठाण तब्बसून, ग्रा पं सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे, पोलिस पाटील प्रशांत वाडीभस्मे, ग्यानीवंत गिर्हेपुंजे, पांडुरंग गिर्हेपुंजे स्वयंपाकी शोभा बावणे आणि अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे आणि मदतनीस सेजल बावणे उपस्थित होते.

Popular Articles