spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एनटीपीसी येथे अन्नत्याग आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना तारसा व चाचेर जि प सर्कलचे भाजपचे भावी प्रबळ उमेदवार वीरेंद्र पायतोडे व खेमराज चाफले यांच्या पाठिंबा 

किशोर साहू, मौदा :- एनटीपीसी मौदा येथील गेट क्रमांक २ वर १५० प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर कायम करण्यासाठी मौदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष प्रसन्ना (राजा) तिडके यांच्या नेतृत्वात गट ग्रामपंचायत धामणगाव चे सरपंच अक्षय पंचबुधे, एकनाथ वडे, तेजराम मोटघरे, सचिन मोटघरे, राकेश वाघमारे, शुभम जुमळे, दिनेश आकरे ,विनोद तिजारे, कैलास मोटघरे, विनोद लांजेवार २० नोव्हेंबर पासून अन्नत्याग आमरण उपोषण करीत आहे. त्यांच्या या उपोषणाला तारसा धामणगाव जिल्हा परिषद सर्कलचे भाजपचे भावी प्रबळ उमेदवार ,भारतीय जनता युवा मोर्चा मौदा तालुक्याचे प्रभारी, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष विरेंद्र पायतोडे, चाचेर निमखेडा सर्कलचे भाजपचे भावी प्रबळ उमेदवार माजी पंचायत समिती मौदा उपसभापती खेमराज चाफले या दोघांनी उपोषण स्थळाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

मागील सात दिवसापूर्वी पासून या उपोषण स्थळाला पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष रामटेक ग्रामीण आनंदराव राऊत,भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, शिवसेना तालुकाध्यक्ष नितेश वांगे, मौदा भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक रमेश कुंभलकर, नगरसेवक मोरेश्वर सोरते,माजी भाजपा मौदा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल सह तालुक्यातील, जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर भेटी देत असून आपला पाठिंबा जाहीर करीत आहेत. मात्र अजूनही एनटीपीसी प्रशासनाने दखल घेतली नसून, आज शुक्रवार (ता.२७ नोव्हेंबर)ला उपोषण सुरूच आहे. उपोषण स्थळी एनटीपीसी अधिकाऱ्यांचे पुतळे जाळणे, प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणे व इतरही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहेत. या उपोषण व आंदोलनाची धग आता संपूर्ण तालुक्यात पसरली असून जिल्ह्यातील, राज्यातील व केंद्रातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे पोहोचल्याने संपूर्ण मौदा तालुकावासियांचे लक्ष या अन्नत्याग आमरण उपोषणाकडे वेधलेले आहे.

Popular Articles