spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आज

 

महानगरपालिकेच्या उपक्रमात मिळणार प्रसिद्ध मूर्तिकारांचे मार्गदर्शन

नागपूर, ता. २१ : पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापनेसाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या पुढाकाराने श्रीगणेशाची मातीची मूर्ती तयार करण्यासाठी निःशुल्क कार्यशाळा उद्या, गुरुवारी (ता. २१ ऑगस्ट) कविवर्य  सुरेश भट सभागृहात सकाळी १० वाजेपासून आयोजित केली आहे. या कार्यशाळेत शहरातील प्रसिद्ध मूर्तींकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहरात पर्यावरण श्रीगणेशांची प्रतिष्ठापना व्हावी, या उद्देशाने हा उपक्रमाला अधिक गती दिली आहे. गेल्यावर्षी झालेल्या या उपक्रमाला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात शहरातील वरिष्ठ अधिकार्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवून श्रीगणेशाची मातीची मूर्ती तयार करण्याचा सराव केला होता. या कार्यशाळेत शाळेतील विद्यार्थी  व आम नागरिकांना सुद्धा शहरातील प्रसिद्ध मूर्तीकारांकडून निःशुल्क मार्गदर्शन मिळणार आहे, या कार्यशाळेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

 

Popular Articles