रामटेक 30 :- रामटेक तालुका शिक्षकेत्तर संघटनेची सभा नुकतीच पार पडली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन कार्यक्रम घेण्यात आला. सदर सभा महाकवी कालिदास सहकारी पतसंस्था, रामटेक,नगर परिषद, रामटेकच्या कार्ययालयात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामटेक तालुका शिक्षकेत्तर सेवक संघाचे अध्यक्ष सुनिल जैयस्वाल होते. प्रमुख पाहूने जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उमेश शेंडे,मनोज पराते,राकेश उमरेडकर, सतीष दहाट,कैलास निघोट आदी उपस्थीत होते. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन सुरेश हलमारे यांनी तर आभार आनंद वाडिवे यांनी मानले. कार्यक्रमास कार्यक्रमाचे यशस्वीकरीता तालुक्यातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले








