गरुड झेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगढ़ १३१० किलो मिटर ची सायकल यात्रा यशस्वी :

0
51
राजगड ३० : गरुड़ झेप मोहिमे अंतर्गत हिंदवी स्वराज्य पथ ३५८ वर्ष पूर्ति आणि “शिव चातुर्य दिन” साजरा करण्यासाठी गरुड़ झेप मोहिम संस्था पुणे यांच्या विद्यमाने १७ ऑगष्ट २०२५ ला आग्रा ते राजगढ़ १३१० किलोमीटरची सायकल यात्रा आयोजित केली. रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आणि सुटका हा त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग आहे. मजल दरमजल करत राजगडावर सुखरूप पोहोचणे हा सर्व घटनाक्रम शिवछत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे वाचायला जितके सोपे वाटते त्याच्या कैक पटीने तो थरार अनुभवणे ही भाग्याची बाब आहे. साहस, धाडस, धैर्य, सातत्य याचा परिचय देते. या मोहीमेत नागपूर मधील टाइगर सिटी साइक्लिंग असोसिएशनचे ६ सायकलस्वार दिलीप वरकड़, प्रदीप देशपांडे, विश्वास चाटी, दिलीप बिरे, धर्मपाल फुलझेले व अर्चना बोंगिलवार यांनी सामिल होऊन ही मोहीम एकूण ४ राज्य आणि ७५ शहरातून मजल दरमजल करत या धाडशी मोहीमेची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केली.