spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकास, रोजगार आणि पर्यावरणपूरक भविष्याचा अर्थसंकल्प

नागपूर :- केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत या संकल्पनेला अधिक बळ देणारा असून सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्ग, युवक, महिला आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवणारा आहे.

पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक वाहतूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्य यांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प आहे.

देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारे ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स, त्यामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे–मुंबई हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, ही राज्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारी घोषणा आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीला चालना मिळेल.

पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मितीस गती मिळेल. तसेच शिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि हरित ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या घोषणा भविष्यातील भारत घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा नसून संधी, समृद्धी आणि शाश्वत विकासाचा स्पष्ट आराखडा आहे. विकसित भारत घडवण्याच्या दिशेने हे एक ठोस आणि सकारात्मक पाऊल आहे.

– आ. संदीप जोशी

Popular Articles